३० हजार सक्रिय सदस्यांचे लक्ष्य

शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांचा निर्धार

by Team Satara Today | published on : 28 July 2025


सातारा : फलटण, कोरेगाव व माण-खटाव विधानसभा मतदार संघासाठी शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकीत जिल्हाप्रमुख चंद्रकांत दादा जाधव यांनी पक्षसंघटना बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करत ३० हजार सक्रिय सदस्यांची नोंदणी करण्याचे लक्ष्य जाहीर केले. 

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. येत्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या बैठकीत शिवसेनेच्या विजयासाठी व्यापक तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले. उपमुख्यमंत्री  ना. एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना. शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष घवघवीत यश मिळवेल, असा विश्वास चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला.

तीनही मतदार संघांत एक लाख प्राथमिक सदस्य नोंदणी पूर्ण झाल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना त्यांनी आता पुढील टप्प्यात ३०,००० सक्रिय कार्यकर्ते तयार करण्यावर भर देण्याची घोषणा केली.

नवीन शाखा, नवे नेतृत्व – संघटन विस्ताराचा जोर

या वेळी जिल्हा समन्वयक विराज खराडे यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी नवीन शाखा सुरू करण्याचे आवाहन केले, तर उपजिल्हाप्रमुख अविनाश फडतरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, "संघटनेत निष्ठेने काम करणाऱ्यालाच पद मिळेल; अन्यथा नवीन नेतृत्व घडवले जाईल."

शिवसेनेत उत्स्फूर्त पक्षप्रवेश :

बैठकीत फलटण आणि माण-खटाव मतदार संघातील इतर पक्षांतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहीदांना मानवंदना :

शिवसेनेच्या वतीने कारगिल युद्धातील शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली, ही एक भावनिक आणि देशप्रेम व्यक्त करणारी बाब ठरली.

बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद :

या बैठकीस शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष विश्वंभर बाबर, कार्यालय प्रमुख विजयसिंह पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक गोडसे दादा, तसेच मतदार संघातील तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, संघटक, विभागप्रमुख आणि शासकीय समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बैठक शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीचा टप्पा ठरून येणाऱ्या निवडणुकांसाठी मजबूत पायाभरणी करणारी ठरली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
2 तासांचा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा पाहून झोप उडेल
पुढील बातमी
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा?

संबंधित बातम्या