माझी वसुंधरा 5.0 योजनेस पाटण तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा योजनेस पाटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत असून पाटण तालुक्यातून 234 ग्रामपंचायतीनी यामध्ये भाग घेतला आहे. यापूर्वी पाटण तालुक्यातून आदर्श ग्रामपंचायत मान्याचीवाडी, ता. पाटण यांनी यापूर्वी बक्षिसे मिळवलेली आहेत. याचा फायदा व मार्गदर्शन इतर ग्रामपंचायतींना मिळण्याच्या दृष्टीने पंचायत समिती पाटणच्या गटविकास अधिकारी सरिता पवार व सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत धनावडे यांनी विशेष लक्ष देऊन माझी वसुधरा 5.0 मध्ये येणार्‍या 20 ग्रामपंचायतींची निवड करुन सदर ग्रामपंचायतींची दिनांक 7 रोजी आदर्श ग्रामपंचायत मान्याचीवाडी ता. पाटण या ठिकाणी प्रत्यक्ष गावभेट व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.

दिनांक 7 रोजी झालेल्या कार्यशाळेमध्ये गटविकास अधिकारी सरिता पवार व सरपंच, रविंद्र माने ग्रामपंचायत मान्याची वाडी ता. पाटण यांनी माझी वसुंधरा 5.0 याबाबत विशेष मार्गदर्शन केले मान्याचीवाडी ता. पाटणचे सरपंच यांनी यापुर्वी केलेल्या कामाचे व माझी वसुंधरासाठी आवश्यक असणार्‍या भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश या पाच थीमेंटिक क्षेत्र त्यामध्ये आवश्यक असणाच्या बाबी त्यांचे गुणांकन याबाबत विस्तृत असे मार्गदर्शन केले व उपस्थितांना प्रत्यक्ष गावभेट ही घडवून आणली. याबाबत गटविकास अधिकारी यांनी या बाबत सर्व ग्रामपंचायतींना मार्गर्शन करत असताना सदरची योजना ही अतिशय चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सुचना व आवाहन केले.

माझी वसुंधरा या योजनेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सातारा याशनी नागराजन व अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन होत असल्याचे गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी सांगितले. या कार्यशाळेचे सुत्रसंचलन संदिप कुंभार विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी केले. कार्यशाळेस सर्व विस्तार अधिकारी (पंचायत) उपस्थित होते. या कार्यशाळेबाबत हजर असणारे मा. सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व संगणक परिचालक यांनी समाधान व्यक्त केले.



मागील बातमी
सत्तेवर येण्याआधीच ट्रम्प यांची एक देश हडपण्याची प्लानिंग
पुढील बातमी
सातारा शहरात शालेय पोषण आहार संघटनेचा मोर्चा

संबंधित बातम्या