सातारा : राजवाडा परिसरातील चांदणी चौकामध्ये महिलेचे गंठण हिसकावून पलायन करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शाहूपुरी पोलिसांनी पाठलाग करून जागीच पकडले आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दोन मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले, शंकर नंदकुमार कदम वय 42 राहणार 272 शनिवार पेठ असे संबंधित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पाच लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, 20 मार्च रोजी राजधानी टावर सातारा येथे एका महिलेच्या काळातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून कदम याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. राजवाडा परिसरातील नागरिकांनी व शाहूपुरी पोलिसांनी संयुक्तपणे पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले, त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्याने शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले या कारवाईमध्ये शाहूपुरी पोलिसांनी पाच लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सोन्याच्या दागिन्यासह हस्तगत केला आहे.
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी कुमार ढेरे, पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, ज्योतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, गोपनीय शाखेचे अमोल साळुंखे, चेतन ठेपणे,यांनी कारवाईत भाग घेतला. या कारवाईबद्दल शाहूपुरी पोलिसांचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे.