तडीपार युवकास फलटण शहर पोलिसांनी केले जेरबंद ; पाठलाग करून घेतले ताब्यात

by Team Satara Today | published on : 07 May 2026


फलटण : सातारा जिल्हा, पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुका, सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातुन दोन वर्षांसाठी तडीपार असलेला सोनल गणेश इंगळे ऊर्फ ढोबळया (वय २१, रा. आखरी रस्ता, मंगळवारपेठ फलटण) याला फलटण शहर पोलिसांनी केले जेरबंद केले. त्याच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. ७ रोजी सायंकाळी ०६.३० वाजता फलटण शहर पोलीस ठाण्याचे  प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंद काळे हे डी. बी. पथकासह पोलीस ठाण्याच्या हददीत गस्त करीत असताना त्यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, पोलीस ठाणे अभिलेखावरील एक तडीपार व्यक्ती  हा बीएसएनएल ऑफिस, फलटण परीसरात फिरत आहे. 

पोलीस पथकाने फलटण बीएसएनएल ऑफिस समोरील रोडवर तडीपार व्यक्तीचा शोध घेतला असता सातारा जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुका, सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातुन दोन वर्षा करीता तडीपार असलेला सोनल गणेश इंगळे पोलीस पथकास पाहून पळून जाऊ लागला. पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. 

ही  कारवाई पोलीस अधिक्षक निखील पिंगळे,   अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अरविंद काळे, सपोनि नितीन शिंदे, पोहवा संतोष नाळे, पोकॉ जितेंद्र टिके, पोकॉ. अतुल बडे यांनी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बलात्काराच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता; बारामती न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
पुढील बातमी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन जिल्हा परिषद सदस्यांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता १९ मे रोजी; संबंधित सदस्य आपली बाजू मांडणार

संबंधित बातम्या