03:43pm | Oct 02, 2024 |
सातारा : येथील कृष्णानगर परिसरातील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात गुरुवार दि. 3 ऑक्टोबर ते शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2024 दरम्यान शारदीय नवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग यांनी दिली.
या नवरात्री उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सर्व उपक्रमास सातारा जिल्ह्यातील भक्तांनी मोठ्या संख्येने तन,मन, धनाने सहभागी होऊन या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. या शारदीय उत्सवामध्ये कार्यक्रमाचा प्रारंभ गुरुवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत श्री दुर्गा सप्तशती पारायण याने होणार आहे. त्यानंतर सकाळी दहा ते अकरा या वेळेत मंदिरातील उमादेवी यांना ललिता सहस्त्रनाम अर्चना आरती व सुवासिनी पूजा होऊन श्री शिवकामसुंदरी देवी यांना ललिता सहस्त्रनाम अर्चना सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता वेदमूर्ती दत्तात्रयशास्त्री जोशी यांच्या पौरोहीत्याखाली सौंदर्यलहरी पारायण ललिता पंचमी निमित्त केले जाणार असून मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते बारा या वेळेत दत्तात्रय शास्त्री जोशी व त्यांच्या ब्रह्मवृंदांच्या हस्ते, चंडी होम संपन्न होणार आहे. तसेच सकाळी दहा ते अकरा या वेळेत कन्या पूजा केली जाणार असून दुपारी एक ते तीन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता महिलांच्या हस्ते दीप पूजा करण्यात येणार आहे. शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसऱ्यानिमित्त सकाळी 11 वाजता महापूजा होणार असून या उत्सव काळात उमादेवी विविध अलंकार पूजा करण्यात येणार आहे. यामध्ये शनिवारी दसऱ्या दिवशी भाज्यांचे अलंकार घालून शाकंभरी रूपातील पूजा केली जाणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दि.4 ऑक्टोबर रोजी गुरु कु. मानसी सदामते यांचे कथक नृत्य सादर होणार आहे. शनिवार दि. 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता नटराज नृत्यकला शाळा साताराच्या शिष्या कुमारी पूजा जाधव व सहकारी शारदा भरतनाट्यम नृत्य संस्थेच्या वतीने यांचे भरत नाट्य होणार असून रविवार दि. 6 ऑक्टोबर रोजी हर्षदा गुजर भिलारे ,नृत्यकला मंदिर फलटण व त्यांच्या शिष्यांचे भरतनाट्यम सादर होणार आहे. बुधवार दि. 9 ऑक्टोबर रोजी नटराज नृत्यकला शाळेच्या ग्रुप सौ. आचल घोरपडे यांचे भरत नाट्यम होणार असून. गुरुवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता सातारा येथील द ब्ल्यू नोट गिटार क्लासेसचे गुरु प्रतीक सदामते व सहकलाकारांचे गिटार वादन संपन्न होणार आहे. मंदिरातील दैनंदिन खर्च हा जनता जनार्दनाच्या देणग्यांमधूनच केला जातो, आपल्या इच्छेनुसार आपणही या धार्मिक कार्यात तन-मन-धनाने सहभागी होऊन सहकार्य करावे अशी अपेक्षा व विनंती मंदिर व्यवस्थापनाने केली आहे.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |