साहित्य विश्व मंडळ संस्थेकडून साहित्य संमेलनासाठी निधी सुपुर्द

by Team Satara Today | published on : 08 July 2025


सातारा : मसाप, शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनच्या वतीने साताऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी आणि नियोजन सुरु आहे. साताऱ्यात होणाऱ्या या संमेलनासाठी विश्व साहित्य मंडळ सातारा या संस्थेकडून १७ हजार १०० रुपयांचा चा निधी संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी या संमेलनामध्ये जी जबाबदारी मंडळाच्या सदस्यांना देण्यात येईल ती प्रामाणिकपणे विनाअट आनंदाने आम्ही पार पाडू, अशी ग्वाही मंडळाच्या वतीने देण्यात आली.

यावेळी बोलताना कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले, हे संमेलन आपल्या सर्वांचे असून थेंबा थेंबाने साचणाऱ्या या संमेलनाच्या आर्थिक बाजू विश्व मंडळाचा पहिला थेंब आहे. मंडळाच्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. यावेळी प्रत्येकाला योग्य वेळी संधी मिळेल फक्त प्रत्येकाने निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करत राहिले पाहिजे. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप कांबळे, संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, ग्रंथालय भारतीचे राष्ट्रीय सचिव प्राध्यापक विश्वास नेरकर यांनी  मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सचिन सावंत, वजीर नदाफ यांनीही संस्थेस धन्यवाद दिले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष हेमा जाधव यांनी केले. 

यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत मंडळाच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमास विश्व साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष सुरेश जाधव, कार्यकारी सदस्य दीपक पवार, वैशाली महाडिक, विजय कदम, संगीता साळुंखे, कांचन सावंत, सदाशिव बर्गे, दिलीप महादार, रूपाली गुरव, जयमाला चव्हाण, सरोजिनी बनसोडे, अनंत कुलकर्णी, सुनिता साबळे, मनीषा कांबळे व विजया देशपांडे यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

माऊली करिअर अकॅडमी च्यावतीने निधी :
या कार्यक्रमात रहिमतपूरचे विजय कदम यांनी माऊली करिअर अकॅडमी यांच्यावतीने पाच हजारांचा निधी विनोद कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केला.त्यांच्या अकॅडमीचे शंभर विद्यार्थी संमेलनाच्या कार्यासाठी स्वखुशीने उपस्थित राहतील व पडेल ते काम करतील असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण
पुढील बातमी
जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा १०० टीएमसीच्या दिशेने

संबंधित बातम्या