पत्त्यांचा गेम अन् जीवाशी खेळ!

स्क्विड गेम पेक्षा भन्नाट वेब सीरिज

ओटीटीवरील अनेक वेब सीरिज चाहत्यांच्या मनात घर करतात. अशाच गाजलेल्या वेब सीरिजपैकी नेटफ्लिक्सवरील स्क्विड गेम एक आहे. २०२१ मध्ये या कोरियन वेब सीरिजचा पहिला सीझन प्रदर्शित झाल्यानंतर सगळेच या सीरिजचे फॅन झाले. त्यानंतर आता काहीच दिवसांपूर्वी या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण, एकीकडे स्क्विड गेमने चाहत्यांना वेडं करून सोडलेलं असताना नेटफ्लिक्सवरीलच एका दुसऱ्या वेब सीरिजची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

तुमच्यापैकी अनेकांनी स्क्विड गेम पहिला असेल. तुम्ही त्याचे फॅनही असाल.पण जरा थांबा...कारण, नेटफ्लिक्सवर स्क्विड गेमपेक्षाही एक भारी वेब सीरिज आहे. जी कदाचित तुम्ही याआधी पाहिली नसेल. ही वेब सीरिज पाहून तुम्ही नक्कीच स्क्विड गेमही विसरुन जाल, यात शंकाच नाही. काही प्लेअर्स सोबत लहानपणीचे गेम खेळायचे, जिंकून शेवटपर्यंत टिकून राहायचं आणि शेवटी भलीमोठी रक्कम घेऊन घरी जायचं ही स्क्विड गेमची बेसिक स्टोरी. पण यापेक्षा भन्नाट स्टोरीआणि ट्विस्ट असलेली वेब सीरिज म्हणजे 'अलीस इन बॉर्डरलँड'

'अलीस इन बॉर्डरलँड' ही एक जपानी वेब सीरिज आहे.बघता बघता अचानक संपूर्ण शहरच एका गेममध्ये जातं आणि पत्त्यांचा गेम खेळू लागतं. जीवंत राहायचं असेल आणि या गेममधून बाहेर पडून पुन्हा स्वतःच्या दुनियेत जायचं असेल तर पत्त्यांचे सर्व कार्ड जमा करायचे. पण, स्क्विड गेमला टक्कर देणारी वेब सीरिज आहे म्हणजे ट्वीस्ट तर असणारच. हा फक्त पत्त्यांचा गेम नाही तर माईंड गेम देखील आहे. वेगवेगळ्या लेव्हलला वेगळे टास्क पार करायचे आहेत. अरीसू हे या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणारी व्यक्तिरेखा आहे. अरिसू त्याच्या मित्रांबरोबर या गेम मध्ये एंट्री घेतो. 

आता अरीसु आणि त्याचे मित्र हा गेम पूर्ण करण्यात यशस्वी होतात का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सीरिज पहावी लागेल. नेटफलिक्सवर या सीरिजचे दोन सीजन रिलीज झाले आहेत. आणि आता तिसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुम्ही जर स्क्विड गेमचे फॅन असाल तर ही वेब सीरिज नक्की बघा. 

मागील बातमी
शेखर गोरेंच्या आमदारकीसाठी कार्यकर्त्यांचे शंभू महादेवाला साकडे
पुढील बातमी
वाल्मीक कराडला खंडणीनंतर मोक्काच्या गुन्ह्यातही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

संबंधित बातम्या