आशुतोषला सोडा, नाहीतर मी आसामला येईन; अभिजीत दिपकेचं मुख्यमंत्री हिमंता यांना थेट आव्हान

by Team Satara Today | published on : 27 September 2026


दिल्ली : 'कॉकरोच जनता पार्टी'चा सह-संयोजक आशुतोष रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी गुवाहाटी येथील एका घरातून ताब्यात घेतले आहे. यानंतर, आता CJP संस्थापक अभिजीत दीपकेने आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना थेट इशारा दिला आहे. "आशुतोषला सोडले नाही, तर CJP च्या दुसऱ्या सदस्यांसह आपण मी आसामला जाईन. हिमंता आम्हा सर्वांना अटक करू शकतात," असे दीपकेने म्हटले आहे.
दीपके म्हणाला, "आशुला आसाम पोलिसांनी एका खाजगी घरातून ताब्यात घेतले आहे. त्याला कोणत्या आरोपांखाली अथवा कोणत्या कारणास्तव ताब्यात घेण्यात आले, हे त्यांना अद्याप सांगण्यात आलेले नाही. जर आशुला सोडले नाही, तर मी इतर सीजेपी सदस्यांसह आसामला जाईन. हिमंता आम्हाला अटक करू शकतात." यापूर्वी, एका छोट्या स्वयंसेवक सभेपूर्वी रांका आणि काही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अज्ञात ठिकाणी नेले होते, असेही दीपके याने म्हटले होते.
...म्हणून मुख्यमंत्री घाबरले आहेत
गुवाहाटीमध्ये स्वयंसेवकांच्या मेळाव्यापूर्वी पोलिसांच्या गाडीतून नेले जात असताना आशुतोष रांकाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत गंभीर आरोप केले. यात तो म्हणाला, "आसाममधील सरकारी शाळांची खरी परिस्थिती देशासमोर येईल या भीतीने मुख्यमंत्री घाबरले आहेत. काझीरंगा परिसरातील स्थानिकांचे जल, जंगल आणि जमिनीचे हक्क हिरावून ते कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात कसे घातले जात आहेत, हे सत्य बाहेर येऊ नये म्हणून ही अडवणूक केली जात आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुष्काळ दिसतोय, आणखी किती ट्रिगर पाहणार?; आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात, जालना येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
पुढील बातमी
२० लाखांची लाच मागितल्याने पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक

संबंधित बातम्या