सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलाकडून महिलांच्या सुरक्षिततेसाठी नाविण्यपूर्ण असा ‘अभया’ उपक्रम सुरु करण्यात येत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये ऑटो रिक्षामधून प्रवास करणार्या महिलांना कोणत्याही व्यक्तींकडून असुरक्षितता भासल्यास किंवा महिलांची कोणी छेडछाड केल्यास, गैरउद्देशाने पाठलाग केल्यास महिलांना तात्काळ मदत मिळण्यासाठी अभया उपक्रमांतर्गत रिक्षामध्ये क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. यामुळे महिला, युवतींना सुरक्षितता मिळण्यास मदत होणार आहे.
सातारा शहारातील ऍटो रिक्षांना पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांनी क्युआर कोडचे स्टिकर चिटकवून आज या उपक्रमाचा प्रारंभ केला. त्यावेळी सातारा शहरातील रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अभया उपक्रमांतर्गत महिलांच्या सुरक्षिततेसाठी सातारा जिल्ह्यातील 9 हजार प्रवासी ऑटो रिक्षांना क्युआर कोड लावण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 2 हजार रिक्षांची नोंदणी करण्यात आली असून, त्यांना क्यूआर कोडींग करण्याचे काम सुरू आहे.
रिक्षांमधील क्यूआर कोड स्कॅन करुन स्वत:चा मोबाईल नंबर सामाविष्ट करुन कळविल्यानंतर तात्काळ मेसेज व लोकेशन सातारा नियंत्रण कक्षास मिळणार आहे. त्यावरुन लोकेशनच्या आधारे तात्काळ पोलीस मदत घटनास्थळी उपलब्ध होईल. तसेच क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित ऍप्लिकेशनव्दारे फोन करण्याची सुविधाही देण्यात आलेली आहे.
सातारा जिल्ह्यात अभया उपक्रमाचा शुभारंभ
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत रिक्षा क्यूआर कोड नोंदणी
by Team Satara Today | published on : 31 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा