सातारा : अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोन युवकांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझारमधील दगडी शाळा येथे श्रीराज संतोष मोदी (वय 23, रा. शिंपी गल्ली, सदरबझार) हा दि. 25 रोजी अंमली पदार्थ सेवन करताना आढळून आला.
दुसर्या घटनेत, दि. 25 रोजी विरेंद्र महेंद्र जाधव (वय 21, रा. सदरबझार) हा दगडी शाळा येथे अंमली पदार्थाचे सेवन करताना पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले यांना आढळून आला. दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.