सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारा व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 23 August 2026


सातारा : सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावतील, असा आक्षेपार्ह मजकूर असलेला व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे नऊच्या सुमारास सातारा शहरातील एका महिलेने दोन समाज माध्यमांवर टाकलेल्या व्हिडिओमध्ये धार्मिक भावना दुखावतील, असा आक्षेपार्ह मजकूर असलेला व्हिडीओ प्रसारित केला होता. या व्हिडीओमुळे धार्मिक भावना दुखावल्याचे नमूद करत संबंधित महिलेविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रेवडी येथील भाजलेल्या वृद्धेचा ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू
पुढील बातमी
लॉकरवर विसरलेले लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने केले प्रामाणिकपणे परत; जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या विश्वासार्हतेचे सर्वत्र कौतुक

संबंधित बातम्या