सातारा : सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावरून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी संध्याकाळी सहा ते रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान अर्जुन आनंदा पवार रा. बोरगेवाडी, ता. पाटण, जि. सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 बीयु 8564 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.