एअर शोचे उत्कृष्ट नियोजन करा - जिल्हाधिकारी संतोष पाटील; साताऱ्यात पहिल्यांदाच होणार एअर शो, प्राथमिक बैठकीत नियोजनाबाबत सूचना

by Team Satara Today | published on : 09 October 2026


सातारा  : साताऱ्यामध्ये पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन करण्यात येणार आहे. या विषयी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक संपन्न झाली.
या बैठकीला सैनिक स्कूलचे प्राचार्य टी.एस.रामनाथन, पोलीस अधीक्षक निखिली पिंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दोन दिवस होणाऱ्या एअर शोमध्ये सुर्य किरण हे वायुदलाचे पथक सहभागी होणार आहे. तसेच एअरफोर्स ड्रील टीम व सिंफनी ऑकेस्ट्रा सहभागी असणार आहेत. यावेळी एअर शोचे उत्कृष्ट नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत समन्वय अधिकाऱ्यांची आढावा बैठक
पुढील बातमी
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लवकरच ! ३० ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे संकेत, निवडणूक आयोगाची बाजू पुढील आठवड्यात

संबंधित बातम्या