खंडाळा : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सातारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत घेतलेल्या बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त यांचे जिल्हास्तरावरील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीकरिता सर्व संबंधित प्रशासकीय अधिकारी यांचे उपस्थितीत विशेष शिबिराचे आयोजन करणेबाबत सूचना दिल्या आहेत.
मा मंत्री मदत व पुनर्वसन यांचे निर्देशानुसार सातारा जिल्ह्यातील वीर, निरा देवघर, महू हातगेघर आणि धोम बलकवडी प्रकल्पग्रस्त यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीकरिता महसूल पंधरवडा कालावधीत दि 01/10/2025 रोजी सर्व प्रशासकीय विभागांचे अधिकारी यांचे उपस्थितीत किसनवीर सभागृह पंचायत समिती खंडाळा येथे विशेष शिबिराचे आयोजन करणेत आले.
सदर विशेष शिबिरामध्ये महसूल, मोजणी, पाटबंधारे, ग्रामविकास या संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पग्रस्त यांचे प्रलंबित मोजणी विषयक कामकाज, कबजेपट्टी व पर्यायी जमीन मागणी विषयक कामकाज, गावठाणातील नागरी सुविधा विषयक कामकाज, पर्यायी वाटप जमिनीतील अडथळे दूर करणे विषयक कामकाज, प्रकल्पग्रस्त यांच्या दाखले विषयक कामकाज इत्यादी विषयांच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्त यांनी त्यांचे प्रलंबित प्रश्न संबंधित शासकीय विभागांसमोर मांडले.
विशेष शिबिरामध्ये प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने प्राप्त निवेदन/अर्ज यावर मा मंत्री मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने तात्काळ नियमोचित कार्यवाही करणेबाबत मा अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांनी संबंधित शासकीय विभागांना सूचना दिल्या.