सातारा : सातारा जिल्हा परिषद मुख्यालय व पंचयात समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा सातारा जिल्हा क्रीडा संकुलात दि. १0 ते १२ जानेवारी दरम्यान होत आहेत. तसेच दि. १२ रोजी दुपारी जिल्हा परिषदेच्या बहुउद्देशीय सभागृहात सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती झेडपीच्या सीईओ याशनी नागराजन यांनी दिली.
या स्पर्धेदरम्यान, वैयक्तीक क्रीडा स्पर्धा प्रकारात १00 मीटर, २00 मीटर आणि ४00 मीटर धावणे, लांबउडी, गोळाफेक, थाळीफेक, बॅडमिंटन, एकेरी टेबल टेनिस एकेरी, कॅरम, बुध्दीबळ अशा स्पर्धा महिला व पुरुष या दोन्ही गटात होणार आहेत.
सांघिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेट पुरुष कबड्डी महिला पुरुष, व्हॉलीबॉल पुरुष, थ्रो बॉल महिला, रस्सीखेच, पुरुष, महिला, खो खो पुरुष, महिला४ बाय १00 रिले पुरुष, महिला अशा स्पर्धा होणार आहेत. क्रिकेटच्या प्रत्येक संघात एक महिला असणार आहे.
या स्पर्धेसाठी इच्छुक अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी तालुकास्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. यातील वैयक्तीक स्पर्धाताील विजेते आणि सांघिक प्रकारातील विजेता संघ यांची यादी प्रत्येक गटविकास अधिकारी यांनी दि. ३ जानेवारपर्यंत सादर केली आहे. यानंतर आता दि. १0 रोजी सकाळ ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत मैदानी व सांघिक खेळांच्या स्पर्धा होतील.
दि. ११ रोजी मैदानी सांघिक स्पर्धा व सायंकाळी ४ ते रात्री १0 पर्यंत सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहेत. दि. १२ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेयपर्यंत क्रीडा पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.