सातारा : ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढे, ता. सातारा येथील हॉटेल अमरच्या पाठीमागे असलेल्य शंकर बबन माने यांच्या मोकळ्या प्लॉटींगमध्ये असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून अज्ञात चोरट्याने 24 हजार रुपये किंमतीची 80 किलो तांब्याची तार लंपास केली. कनिष्ठ तंत्रज्ञ प्रदीप श्रीरंग गोरे , रा. वडूथ, यांनी फिर्याद दिली. सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.