सातारा : काशीळ ता. सातारा गावाच्या हद्दीत बसस्थानकाच्या वाहतूक नियंत्रण कक्षातील व्हिडिओ रेकॉर्डिंगचे मशीन अज्ञाताने चोरून नेले. ही घटना 18 डिसेंबर रोजी रात्री दहाच्या नंतर घडल्याचा संशय आहे.
याप्रकरणी काशीळ वाहतूक नियंत्रण कक्षाचे चंद्रकांत दाजी शिवदास (वय 57) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे .उंब्रज बस स्थानकामध्ये आलेल्या गाड्यांचा पुकारा करण्यासाठी नेटवर्किंग व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच इतर साहित्य बसवण्यात आले होते या साहित्याची किंमत तब्बल 40 हजार रुपये इतकी आहे. हे साहित्य अज्ञाताने गुरुवारी रात्री लांबवले या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एच. डी. भोसले करत आहेत.