सातारा : समाजातील दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी दिव्यांग व दिव्यांगत्व नसलेल्या व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत आहे.
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहायाच्या योजना लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे यांनी केले आहे.