09:43pm | Nov 07, 2024 |
सातारा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली असून यामध्ये फसवेगिरी होणार नाही. या योजना राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर सुरू होतील. सातारा जिल्ह्यातील निवडणुकीतही महाविकास आघाडी एकदिलाने काम करत आहे. काही नाराजी असेल तर दोन दिवसांत दूर होईल, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव यांनी दिली.
येथील काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष डाॅ. जाधव बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अरबाज शेख आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष डाॅ. जाधव म्हणाले, राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. यासाठी महाविकास आघाडीने लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केली. महिला, मुली, तरुण आणि शेतकरी वर्गांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. काँग्रेसने तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात पाच गॅरंटी दिल्या होत्या. त्या योजना आजही तेथे सुरू आहेत. तसेच महाराष्ट्रातही ही पंचसूत्री सत्ता आल्यानंतर लागू होईल. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल.
सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत आघाडी धर्माचे पालन का होत नाही, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर जिल्हाध्यक्ष डाॅ. जाधव यांनी जिल्ह्यात महाविकास आघाडी एकसंघ आहे. काँग्रेस आघाडी धर्म पाळत आहे. नाराजी कोठे असेल तर दोन दिवसांत ती दूर होईल. समजूत काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही एकदिलानेच काम करत आहोत, असे स्पष्ट केले.
उदयनराजेंच्या प्रश्नांवर वरिष्ठ उत्तर देतील... पत्रकार परिषदेत सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आरोप केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या शब्दाचा अनर्थ केला असावा. याची पूर्ण माहिती घेण्यात येईल. तसेच याबाबत पक्षाचे वरिष्ठ अधिकृतपणे उत्तर देतील, असे उत्तर देण्यात आले. तसेच महायुतीकडून खोटा प्रचार होत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |