लाचप्रकरणी अजित घाडगे याला 2 दिवसांची पोलीस कोठडी

by Team Satara Today | published on : 06 June 2025


सातारा : सातबारावर नाव तसेच इतर कामे करून देण्यासाठी 75 हजार रुपये स्वीकारल्यानंतर मंडलाधिकारी अजित घाडगे याला न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खिंडवाडी, तालुका सातारा येथील जागे प्रकरणी सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी तक्रारदार कोडोली येथील तत्कालीन मंडलाधिकारी अजित घाडगे याला भेटले होते. त्या कामासाठी घाडगे याने पैसे मागितल्याने तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) तक्रार केली. त्यानुसार गुरुवारी एसीबी विभागाने पडताळणी करून कारवाई केली. रोख 75 हजार रुपये स्वीकारताना सातार्‍यात कारवाई झाल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली.

संशयित अजित घाडगे याला शुक्रवारी एसीबी विभागाने न्यायालयात हजर केले. यावेळी बचाव व सरकार पक्षाने युक्तिवाद केल्यानंतर न्यायाधीशांनी घाडगे याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. युक्तिवादामध्ये सरकार पक्षाकडून लाचेची रक्कम मोठी असल्याने यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? यासह विविध बाबींचा तपास करायचा असल्याचे सांगितले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तडीपार गुंडांकडून अवैध शस्त्रसाठा हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पुढील बातमी
जुगार प्रकरणी तीनजणांवर गुन्हे

संबंधित बातम्या