सातारा : विषारी औषध प्राशन केलेल्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका 21 वर्षीय युवतीने विषारी औषध प्राशन केले होते. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.