सातारा : जबरी चोरी, दुखापत प्रकरणी दोन जणांना जमावाने मारहाण केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी पहाटेच्या सुमारास जुनी भाजी मंडई चौकातील प्रवीण भोसले यांच्या सोन्याच्या दुकानात जबरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सिद्धांत जयवंत साळुंखे रा. तामजाईनगर, सातारा आणि शुभम दीपक इंगवले रा. किडगाव, ता. सातारा यांनी चोरी करीत असताना ऋषिकेश सदानंद तिताडे रा. जुनी भाजी मंडई, सातारा यांच्या वर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले. यावेळी जमलेल्या लोकांनी साळुंखे आणि इंगवले यांना मारहाण केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करीत आहेत.