तीन राज्यांतील भाजपच्या विजयाचा सातार्‍यात जल्लोष; मोती चौकात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी; नागरिकांसोबत आनंद व्यक्त करत साखर वाटली

by Team Satara Today | published on : 05 May 2026


सातारा : अलीकडील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या यशानंतर सातारा शहरात मंगळवारी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मोती चौक परिसरात भाजपच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र येत नागरिकांसोबत आनंद व्यक्त करत साखर वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला.

सकाळी 11 वाजता झालेल्या या उपक्रमात शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजपचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी नागरिकांनाही या उत्सवात सहभागी करून घेत साखर वाटप करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी बोलताना केंद्रातील नेतृत्वाच्या कार्यपद्धतीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने राबवलेल्या धोरणांना देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या निवडणूक निकालांनी भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष ऍड. दत्ता बनकर, सभापती धनंजय जांभळे, बाह्य मंडळ अध्यक्ष वैशाली टंगसाळे, मध्य मंडल अध्यक्ष अविनाश खर्शीकर, ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ताजी थोरात व प्रभावती दरेकर, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, प्रवीण शहाणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तेजस्विनी घोरपडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल चिकणे, ड. विनीत पाटील, कल्याण राक्षे यांच्यासह नगरसेविका अर्चना कांबळे, रीना भणगे, गीता रणदिवे, शुभदा महाबळेश्वरकर, नंदा इंगवले, सुवर्ण पाटील, दिपाली देशमाने, अश्विनी हूबळीकर, रोहिणी क्षीरसागर, वैष्णवी कदम, वृषाली दोशी, मनीष महाडवाले, दीपक क्षीरसागर, अक्षय भोसले आदी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
श्री. छ. वृषालीराजे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट; एनसीईआरटीच्या मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यावर व्यक्त केली नाराजी
पुढील बातमी
उन्हाच्या तडाख्यात शाळा सुरूच; कडवे बुद्रुकमध्ये पालक-ग्रामस्थ आक्रमक, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी

संबंधित बातम्या