सातारा : सातारा शहर परिसरात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवती बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातून अनुक्रमे 18 व 20 वर्षीय युवती दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बेपत्ता झाल्या आहेत. एक कॉलेजला जाते, असे सांगून तर दुसरी घरातील साहित्य आणायला जाते असे सांगून दोघी निघून गेल्या आहेत. सातारा शहर पोलीस तपास करत आहेत.