सातारा : जिल्ह्यात महायुतीची एकहाती सत्ता आली असून, जिल्ह्यातील आठही जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी पाच आमदारांनी शनिवारी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यानंतर रविवारी तीन आमदारांनी पहिल्यांदाच अशी शपथ घेतली. कराड दक्षिणचे डॉ. अतुल भोसले, कराड उत्तरचे मनोजदादा घोरपडे व फलटणचे सचिन पाटील यांनी पहिल्यांदाच आमदार म्हणून विधिमंडळाची पायरी चढली. त्यांनी शपथ घेऊन रविवारपासून आपल्या नव्या राजकीय इनिंगला प्रारंभ केला.
सातारा जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा; मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा बालेकिल्ला महायुतीने पुरता उद्ध्वस्त केला. आठही विधानसभा मतदारसंघांवर विजय मिळवत त्यांनी महाविकास आघाडीचा सुपडासाफ केला. त्यानंतर नवे सरकार येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी सोहळाही पार पडला. नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी विशेष अधिवेशन बोलावले. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी जिल्ह्यातील 8 आमदारांपैकी आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शंभूराज देसाई, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे व आ. महेश शिंदे या 5 आमदारांनी शपथ घेतली होती.
दुसर्या दिवशी रविवारी जिल्ह्यातील पहिल्यांदाच आमदार झालेले कराड दक्षिणचे आ. डॉ. अतुल भोसले, कराड उत्तरचे आ. मनोजदादा घोरपडे व फलटण-कोरेगावचे आ. सचिन पाटील या तिघांनी ‘मी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने मी ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाची खरी, श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन, आता जे कर्तव्य हाती घेणार आहे. ते निष्ठापूर्वक पार पाडीन,’ अशी शपथ घेतली.
कराड उत्तरचे आ. मनोजदादा घोरपडे यांनी आमदार झाल्यावरच जॅकेट परिधान करण्याचा ‘पण’ केला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत विधानसभेत मजल मारली. ‘पण’ पूर्ण झाल्यामुळे रविवारी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेताना त्यांनी जॅकेट परिधान केले. शपथ घेतल्यानंतर शेवटी त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम व जय यशवंतरावजी चव्हाणसाहेब,’ असा उल्लेख केला. चव्हाणसाहेबांच्याही स्मृती जाग्या केल्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आ. मनोजदादांचे कौतुक केले.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |