सातारा : सातारा शहरातील मल्हारपेठ येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या सूर्यकांत एकनाथ शिंदे (वय ७७, रा. मोळाचा ओढा) यांना एमआरआय तपासणीसाठी यशवंत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
एमआरआय सुरू असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ उपचार सुरू करण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार सणस करीत आहेत.