कराड : घरगुती गॅस सिलिंडचा वापर प्रवाशी रिक्षांसाठी केला जात असल्याच्या तक्रारीवरून कराड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने कराड, बनवडी, मलकापूर येथे छापे टाकून 76 सिलिंडरच्या टाक्या जप्त केल्या आहेत. मागील दोन वर्षातील या कारवाया आहेत.
दरम्यान गॅस सिलिंडरचा ऐवध साठा करणे व प्रवाशी रिक्षात गॅस भरणे या प्रकरणी 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पुरवठा अधिकारी साहिला नायकवडे यांनी दिली. आगाशिवनगर येथील पूजा मार्केट पाठीमागे छापा टाकून बाबासाहब इसाक मुल्ला,सादीक मुबारक मुजावर, इर्शाद रियाज नदाफ यांच्याकडून 25 सिलिंडच्या टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढेबेवाडी फाटा मलकापूर येथे छापा टाकून आसीफ नबीलाल मोमीन याच्याकडून 2 टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
विश्रामनगर मलकापूर येथील कारवाईत अजय प्रफुल्ल काळसेकर याच्याकडून 9 टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. बागलवस्ती आगाशिवनगर येथील कारवाईत विशाल शिवाजी पवार याच्याकडून 2 टाक्या, मंगळवार पेठ पालकर वाडा येथील कारवाईत इकबाल इसाक शेख याच्याकडून 6 टाक्या जप्त करण्यात आल्या आहे.
सरिता बझार समोर आगाशिवनगर येथील कारवाईत विजय चंद्रकांत लाड याच्याकडून 2 टाक्या, सैदापूर कराड येथील कारवाई मोहसिन इसाक मुजावर याच्याकडून 2 टाक्या, स्टडियमच्या पाठिमागील बाजूस कारवाई करून बाबासाहब इसाक मुल्ला याच्याकडून 3 टाक्या, बनवडी फाटा येथील कारवाईत महेश चव्हाण व संजय चौगुले यांच्याकडून 25 टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. कराड, बनवडी, मलकापूर येथील छाप्यात एकूण 76 सिलिंडरच्या टाक्या जप्त करण्यात आल्या असून 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुरवठा विभागाकडून तपासणी सत्र सुरू असून रिक्षात घरगुती सिलिंडर गॅस भरणे, अवैध साठा करणे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. या टाक्या कोणत्या गॅस एजन्सीच्या आहेत. साठा करणारांकडे त्या कशा आल्या याचीही चौकशी करण्यात येत आहे. -साहिला नायकवडे, पुरवठा अधिकारी, कराड.