सातारा : अजिंठा चौक ते पंचामृत हॉटेलच्या दरम्यान अज्ञात तिघांनी महादेव आत्माराम शेडगे (वय ५२, रा. अंगापूर, सध्या रा.अमरलक्ष्मी कोडोली सातारा) यांच्याकडून फोन करण्यासाठी ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल घेतला. तो परत न देता तिघांनी मोबाईल घेऊन पळ काढला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार माने करत आहे.
फोन करण्यासाठी वॉचमनकडून मोबाईल मागून काढला पळ; अज्ञात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 05 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा