सातारा : कामाच्या ठिकाणावरून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास सातारा येथील कामाच्या ठिकाणावरून सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी 21 वर्षीय युवती दवाखान्यातून जाऊन येते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.