मारहाण प्रकरणी दोन जणांवर गुन्हा

सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी रात्री नऊ वाजता सोसायटीमधील लिफ्ट वापराच्या कारणावरून गजानन आनंदराव कदम रा. विकास नगर, सातारा यांना तेथीलच अनिल कोकाटे आणि प्रमोद निकम उर्फ चिक्या यांनी लाकडी दांडके व लोखंडी राॅडने मारहाण करून जखमी केले आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पवार करीत आहेत.


मागील बातमी
महामार्गावरून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या