03:26pm | Sep 05, 2024 |
प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात आपल्यासमोर 11 ऑक्टोबरला भेटायला येणार आहे. यात व्यंकट शास्त्री यांची अतिशय सशक्त व्यक्तिरेखा; अभिनेता गश्मीर महाजनी याने साकारली आहे. सोबत ‘फुलवंती’ या मध्यवर्ती भूमिकेत चतुरस्त्र प्राजक्ता माळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सिनेमात प्राजक्तासोबत प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी हा देखील स्क्रिन शेअर करणार आहे. या सिनेमाचं नवं पोस्टर रिलिज झालं आहे. यातून गश्मीरच्या भूमिकेचा लूक समोर आला आहे.
गश्मीर कोणती भूमिका साकारणार?
छत्रपतींनंतर मराठा साम्राज्याची धुरा पेशव्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. त्यांच्या दरबारात एकापेक्षा एक धुरंदर होते. त्यातील एक म्हणजे सकल शास्त्रपारंगत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री! श्रीमंतांच्या दरबारातील साक्षात बृहस्पती! पेशव्यांच्या दरबारात त्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेत अभिनेता गश्मीर महाजनी दिसणार आहे. व्यकंट शास्त्री यांचे व्यक्तिमत्व, त्यांची बुद्धिमत्ता आणि चारही दिशांना पसरलेली त्यांची किर्ती हे सर्व आपल्याला या ऐतिहासिकपटातून पाहायला मिळणार आहे. शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर या व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली.
गश्मीरकडून आनंद व्यक्त
अभिनेता गश्मीर महाजनी याने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठी चित्रपटांसह, हिंदी मालिका आणि रिअॅलिटी शोमधून लोकप्रियता गश्मीर महाजनीने वेगळी ओळख निर्माण केली. गश्मीर ‘फुलवंती’ चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल तितकाच उत्सुक आहे. पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकट शास्त्री यांची ही दमदार कथा आहे. ‘फुलवंती’ चित्रपटाच्या निमित्ताने वेगळ्या धाटणीची भूमिका करता असल्याचा आनंद गश्मीरने व्यक्त केला.
‘फुलवंती’ या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण तरडे यांनी केलं आहे. दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |