फलटण : फलटण तालुक्यातील कोळकी येथील हॉटेल कामगाराचा खून केल्याप्रकरणी दोनजणांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी सुमारे दुपारी 3 वा. च्या सुमारास कोळकी- दहीवडी व शिंगणापूर कडे जाणार्या रस्त्याच्या चौकातील पानटपरी चे मालक अमोल वनारे, वय 28 वर्षे, रा. कोळकी व त्याचा मित्र सलमान रफीक शेख, रा. सोनवडी, ता. फलटण हे दोघे यामाहा मोटर सायकलवरुन जेवणाचे पार्सल नेण्यासाठी हॉटेल आमंत्रण, कोळकी येथे आले होते. त्यावेळी अमोल वनारे याने चिकन तंदुर थाळी, 5 रोटी व 2 भाकरी घेण्यासाठी ऑर्डर दिली. त्यावेळी त्यांचा आणि आमंत्रण हॉटेल मधील कामगार विपूल उर्फ डॉन मुर्म, रा. उडीसा राज्य (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यास हॉटेल मॅनेजर अक्षय भालचंद्र काळे, वय 32 वर्षे यांनी रोटी व भाकरी पॅक करण्यासाठी कागद आणण्यासाठी विपूल उर्फ डॉन मुर्म यास सांगीतले. त्यावेळी विपूल उर्फ डॉन मुर्म याने अक्षय भालचंद्र काळे यास काहीतरी बोलुन दुर्लक्ष केल्याने, अमोल वनारे याने विपूल उर्फ डॉन मुर्म याच्या डोक्यात टपली मारली. त्यावरुन त्यांच्यामध्ये झटापट झाली. त्यावेळी सलमान रफीक शेख याने सुध्दा विपूल उर्फ डॉन मुर्म यास मारहाण केली. या झटापटीत अमोल वनारे याने तेथील लोखंडी सळई घेवून विपूल उर्फ डॉन मुर्म याच्या डोक्यात व शरीरावर मारहाण केली. त्यामुळे विपूल उर्फ डॉन मुर्म हा गंभीर जखमी झाला.
जखमी विपूल उर्फ डॉन मुर्म यास जीवनज्योती हॉस्पीटल, कोळकी येथे दाखल केले. यानंतर पुढील औषधोपचारासाठी मुर्म यास ससुन हॉस्पीटल, पुणे येथे नेले असता, त्यास रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच तो मयत झाला.
ही माहिती मिळताच पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना माहिती सांगण्यात आली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार फलटण शहर पोलीस ठाण्याचे सपोनि. नितीन शिंदे, पो.उपनिरी. सुरज शिंदे आणि पो.उपनिरी. मृगदीप गायकवाड आणि पोलीस अंमलदारांची तीन पथके बनविली. सपोनि. नितीन शिंदे हे पुणे येथील तपासकामी रवाना झाले. गुन्ह्याचे घटनास्थळ असलेल्या हॉटेल आमंत्रण येथे फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी भेट दिली आहे. या गुन्ह्यातील दोन्ही संशयीत आरोपींकडे चौकशी सुरु आहे.
या गुन्ह्याच्या तपासात पोह. चंद्रकांत धापते, सचिन जगताप, बापूराव धायगुडे, नाना होले, मल्हारी भिसे, मपोना. हेमा पवार, पोशि. स्वप्नील खराडे, अतुल बढे, महेश जगदाळे, अनिल देशमुख व इतर पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |