सातारा : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऋत्विक धनंजय पंडित (रा. गडकर आळी, सातारा) याला जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना तो दि. 15 रोजी हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून सातारा शहरातील शाहूपुरी चौक ते दिव्यनगरी रस्त्यावर असलेल्या हॉटेलच्या समोर आढळून आला. पुढील तपास पोलीस हवालदार इंगळे करीत आहेत.