प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी पुष्पलता बोबडे

व्हा. चेअरमनपदी संजीवन जगदाळे यांना संधी

by Team Satara Today | published on : 02 July 2025


सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी प्राथमिक शिक्षक समितीच्या पुष्पलता संजय बोबडे, तर व्हा. चेअरमनपदी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे संजीवन रामचंद्र जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली. चेअरमनपदाची धुरा पुन्हा एकदा फलटणकडे गेली आहे. उदय शिंदे आणि सिध्देश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली या निवडी करण्यात आल्या.

चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीसाठी शिक्षक बँकेच्या सभागृहामध्ये निवड प्रक्रिया पार पडली. सहायक निबंधक राहुल देशमुख निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षक समितीचे सिध्देश्वर पुस्तके, उदय शिंदे, सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली किरण यादव, सुरेश पवार, नवनाथ जाधव, महेंद्र जानुगडे, संजीवन जगदाळे, विशाल कणसे, विजय ढमाळ, संजय संकपाळ, विजय शिर्के, नितीन फरांदे, नितीन शिर्के, पुष्पलता बोबडे 16 संचालक निवडीवेळी एकत्र आले होते. संभाजीराव थोरात आणि बलवंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, निशा मुळीक, शहाजी खाडे, ज्ञानोबा ढापरे यांची यावेळी उपस्थिती होती. मावळत्या चेअरमन निशा मुळीक व व्हा. चेअरमन सुरेश पवार यांनी नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार केला.

यावेळी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस संतोष मांढरे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासो भोसले यांची यावेळी उपस्थिती होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
१ चमचा गुलकंद ठेवतो 'या' ७ समस्यांपासून दूर !
पुढील बातमी
मोलकरणीने मारला सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

संबंधित बातम्या