जिल्हा बँकेत ९.०० टक्के व्याजदराची भांडवल पर्याप्तता दीर्घ मुदत ठेव योजना कार्यान्वीत : श्री. नितीन पाटील, अध्यक्ष

सातारा : सातारा जिल्हयाची अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने, ठेवीदारांना उत्तम व्याज परतावा मिळावा या करीता दि २०/०१/२०२५ ते दि. ३१/०३/२०२५ या कालावधीत सर्व ठेवीदारांकडून स्विकारावयाच्या कमीत कमी रू .१००००/-  व त्यापुढे  रू .१००००/-  चे पटीत ५ वर्षे ३ महिने मुदतीची ९.००  टक्के द .सा .द .शे .व्याजदराची भांडवल  पर्याप्तता दीर्घ मुदत ठेव योजना सुरू केली आहे. सदरची ठेव योजना मर्यादित कालावधीत सुरू रहाणार असुन, या ठेव योजनेच्या अटी व वैशिष्टे  इ .बाबींची माहिती जाणुन घेणेसाठी या बँकेच्या नजिकच्या शाखेशी संपर्क साधावा व या ठेव योजनेचा लाभ घ्यावा . 

तसेच या बॅंकेचे १८१ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी ६.०० टक्के, १ वर्ष ते ३ वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी ७.५० टक्के व ३ वर्ष ते १० वर्षापर्यंत ७.२५ टक्के दराने मुदत ठेवीवर व्याजदर लागू  आहेत. बँकेने नेहमीच्या ठेव योजना व्यतिरिक्त एकरक्कमी रू .१५ लाख व त्यावरील रक्कमेची ५५५ दिवस मुदतीची ८.०० टक्के द .सा ..द .शे .व्याजदराची मुदत ठेव योजना सुरू आहे . तसेच दामदिडपट ठेवीचा कालावधी ६७ महिने २२  दिवस आहे .  ग्राहकांना NEFT, RTGS, ATM, डेबीट कार्ड, SMS अलर्ट, DBTL, IMPS, BBPS, इंटरनेट बँकिंग, UPI, Mobile IMPS लघु व्यवसाईकांसाठी क्यू आर कोड इ . सुविधा उपलब्ध केल्या असून  एनी ब्रँच बँकिंगच्या सुविधा विना कमिशन दिल्या जात आहेत . तसेच बँक ठेवीदारांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लाभ देत असून, याकरिता रू . २ लाख विमा संरक्षणासाठी प्रिमिअम रक्कम रु .२०/- बँक स्वनिधीतून भरत आहे .बँकेच्या ठेवीदारांनी नजीकच्या शाखेत संपर्क साधून या योजनेचा फॉर्म भरून देणेचा आहे . तसेच बँकेच्या ग्राहकांना सुरक्षित लॉकर  सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे . 

जिल्हयातील बँकेच्या  ३१७ शाखा व ०२ विस्तारीत कक्षाद्वारे ग्राहकांची सेवा बँक करीत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिव्हाळ्याची सेवा देण्यास सदैव तत्पर आहे. बँकेचे सर्व ठेवीवरील व्याजदर अत्यंत आकर्षक असून रू. ५ लाखापर्यंतचे सर्व ठेवींना विमा संरक्षण  आहे. बँकेने कर्ज वसूलीचे कामकाज सातत्याने प्रभावशाली केलेने गत १७ वर्षे बँकेच्या निव्वळ अनुत्पादक कर्जाचे (एनपीए) प्रमाण 'शून्य' टक्के राखले आहे .

बँकेच्या कामकाज अनुषंगाने मा .ना .श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा .ना .श्री .मकरंद पाटील(जाधव), मा .खा .श्रीमंत छ .उदयनराजे भोसले, ज्येष्ठ संचालक मा .आ .श्रीमंत रामराजे नाईक निबंाळकर, मा ..श्री .बाळासाहेब पाटील यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे . बँकेने जिल्हयातील ग्राहकांना सर्वात कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तसेच शासन व्याज परतावा अनुदानीत विविध कर्ज योजना बँकेमार्फत राबविल्या जात आहेत. तरी ठेवीवरील वाढ केलेल्या व्याजदराचा लाभ घेणेसाठी ग्राहकांनी बँकेच्या नजिकचे शाखेमध्ये संपर्क साधावा.

जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी बँकेने ठेवी व कर्जाच्या अनेकविध योजना आखल्या असून, त्यास जिल्हयातून चांगला प्रतिसाद प्राप्त होत आहे. तद्वतच, कृषी व कृषी औद्योगिक उत्पादनात भरघोस वाढ करण्यांसाठी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. तेंव्हा आजच बँकेच्या नजिकचे शाखेमध्ये विविध ठेव योजनेत गुंतवणूक करावी, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष, मा .खा .श्री .नितीन पाटील (जाधव), उपाध्यक्ष मा .श्री .अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी  मा .श्री डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.

मागील बातमी
न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रचला इतिहास
पुढील बातमी
बेकायदा बांधकामप्रकरणी आत्मदहनाचा इशारा

संबंधित बातम्या