सातारा : अपघात प्रकरणी टँकर चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरालगत महामार्गावर झालेल्या अपघात प्रकरणी सद्दाम हुसेन अन्सारी (वय 25, रा. मुंबई) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आनंद बाळगौंडा पाटील (वय 26, रा. बेळगाव) यांनी तक्रार दिली आहे. सद्दाम अन्सारी याने त्याच्या ताब्यातील टँकर सुरु केल्यानंतर तक्रारदार यांच्या कारला धडक बसली. ही घटना दि. 20 एप्रिल रोजी घडली आहे.