सातारा : सातारा शहरानजीक असलेल्या खेड येथील सुभद्राकुंज अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये बिल्डिंगच्या मेंटेनन्सच्या कारणावरून अजय रामचंद्र माने (वय ५८ वर्ष) यांना त्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या कृष्णांत दिनकर जाधव आणि त्यांचा भाऊ व पुतण्यासह इतर दोन अनोळखी व्यक्तींनी लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले आहे.
ही घटना दि २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३६ वाजता घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अजय माने यांनी दि ५ मार्च रोजी फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करत आहेत