सातारा : जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देणारे हे साहित्य निश्चितच वाचकांच्या मनाला स्पर्श करेल. साळवे यांनी आपल्या लेखणीतून मांडलेला आशय अतिशय भावस्पर्शी आहे. त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा, असे प्रतिपादन श्री. छ. वृषालीराजे भोसले केले.
सातारा रेल्वे स्टेशनचे परिवहन निरीक्षक राजकुमार साळवे यांच्या 'जीवन जीता जाऊं' या कवितासंग्रहाचे प्रकाशन रेल्वेस्टेशन परिसरात श्री. छ. वृषालीराजे भोसले व कॉसमॉस बँकेचे संचालक बाळासाहेब साठे यांच्यासह रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोल्रेत होत्या. रेल्वेचे सहाय्यक मंडल रेलपथ अभियंता राकेश शर्मा, सहाय्यक मंडल सिंग्ग्रल अभियंता रवी पराते, सहाय्यक मंडल विद्युत अभियंता विजय सिंह, सेवानिवृत्त स्टेशन प्रबंधक विश्वजीत किर्तीकर,संभाजी महाडिक, लेखक नितीन साळुंखे, उद्योजक राहल किर्तीकर यांच्यासह रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमंत वृषालीराजे भोसले म्हणाल्या, साहित्य, कला आणि संस्कृती जपणाऱ्या अशा प्रेरणादायी उपक्रमांना माझा सदैव पाठिंबा राहील. यावेळी बाळासाहेब साठे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविकात राजकुमार साळवे यांनी 'जीवन जीता जाऊं' या कवितासंग्रहाची माहिती दिली.
या कार्यक्रमात बालचमूने सादर केलेली नृत्य, संगीत व गायनाची कला सादरीकरणे अत्यंत सुंदर होती. उपस्थित रसिकांनी या कलाविष्काराचा मनमुराद आनंद घेतला. याप्रसंगी मंडल अधिकारी राकेश शर्मा, मंडल सिग्नल अभियंता रवी पराते, मंडल विद्युत अभियंता विजय सिंग, मंडल राजभाषा अधिकारी राजू तळेकर, तसेच राहुल कीर्तिकर, नितीन साळुंखे, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.