सातारा : अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी अंगापूर तर्फ तारगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी पांडुरंग श्रीरंग मोहिते रा. आंबेवाडी, पोस्ट अपशिंगे, ता. सातारा यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून 850 रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या कारवाईत, कण्हेर, ता. सातारा गावच्या हद्दीतून सुरज यशवंत शिरोळे (लोहार) रा. जोतिबाची वाडी, ता. सातारा यांच्याकडून 750 रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.