वाईनजीक कमाजीमाळ वस्तीतील शेतात असलेले बंदिस्त घर चोरट्याने फोडले; हजारो रुपयांचा ऐवज लंपास

by Team Satara Today | published on : 12 July 2026


वाई : वाईनजीक असलेल्या कमाजीमाळ वस्तीतील शेतात असलेले बंदिस्त घर चोरट्याने फोडले. या घराचे कडी व कोयंडे तोडून कपाटातील कपडे, घरगुती साहित्य व धान्यावर डल्ला मारून चोरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे.

वाई येथील सिद्धनाथवाडी मधील रहिवाशी मनोज विठ्ठल यादव यांचे पसरणी हद्दीतील कमाजीमाळ येथील शेतामध्ये घर आहे. सध्या या घरांमध्ये रात्री कोणीही राहावयास नसल्याने ते बंदिस्त होते. शुक्रवारी मध्यरात्री हे घर चोरट्यांनी फोडले. या घरातील कपाटाचे लॉक तोडून कपडे, धान्य व घरगुती साहित्य लंपास केले. तसेच या ठिकाणी शिर्के थोपटे यांच्याही घरामध्ये अशाच प्रकारे चोरी झाली आहे.

अशीच एक घटना दोन दिवसापूर्वी सह्याद्री नगर येथे घडली होती. पोलिसांना अजूनही त्याचा कुठलाही सुगावा लागलेला नाही व गत दोन वर्षांमध्ये हे घर तिसऱ्यांदा फोडून चोरी करण्यात आली आहे. यामुळे येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांनाच चोरांनी आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. संबंधित चोरीच्या घटनेचा पंचनामा व तपास पोलिसांकडून करण्यात आला असून याचा लवकरच छडा लावण्याचे आश्वासन पोलीस अपनिरीक्षक अमित सुर्वे यांनी दिले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; उमेश चव्हाण यांची माहिती
पुढील बातमी
महामार्गाच्या कामावरून एनएचआयचे अधिकारी फैलावर; स्मार्ट मीटरला सदस्यांचा विरोध, खा. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची सभा

संबंधित बातम्या