श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान

by Team Satara Today | published on : 19 December 2024


सातारा : श्रीरामकृष्ण विवेकानंद भाव प्रचार परिषद महाराष्ट्र यांच्यातंर्गत कार्यरत असलेल्या श्रीरामकृष्ण सेवा मंडळ यांच्यावतीने श्रीरामकृष्ण आश्रमात श्री मॉं सारदादेवी यांच्या १७२ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि. २२ डिसेंबर रोजी विशेषपूजा, प्रात:स्मरण, भजने, हवन, प्रसाद, जपयज्ञ, आरती, संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता पुणे येथील डॉ.श्री.शिरीष लिमये यांचे माताजी श्रीसारदादेवींची वचने आणि उपदेश या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर बुधवार दि. १ जानेवारी २०२५ हा दिवस कल्पतरु दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून यादिवशी सकाळी विशेष पूजा, प्रात:स्मरण, संध्याकाळी भजने, प्रसाद, श्रीरामकृष्ण नामसंकीर्तन होणार आहे.

या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीरामकृष्ण सेवा मंडळाचे अध्यक्ष रमणभाई शहा, नंदकुमार सावंत, डॉ. शैला कापरे, प्रसाद पवार, आशिष दळवी, हेमंत गुजर आणि सदस्य राजेंद्र जाधव, अनिरुध्द कोकाटे, मिलिंद तळवलकर, पंकज भोसले, नरेश जाधव यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कांद्याच्या दरात घसरण
पुढील बातमी
रविचंद्रन अश्विनचे निवृत्तीनंतर चेन्नईमध्ये स्वागत

संबंधित बातम्या