श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात

by Team Satara Today | published on : 04 February 2026


सातारा :   करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये  एक प्रसिद्ध लेखक व सामाजिक कार्यकर्ते श्री नारायण आनंदराव जावलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात पार पडला. या समारंभाचे नियोजन संस्था सचिव तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.

प्रमुख पाहुणे  नारायण जावलीकर यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना जिद्द व चिकाटी ठेवा म्हणजे यश नक्की मिळेल हा मोलाचा संदेश दिला. तसेच लाल बहादूर शास्त्री व स्टीफन हॉकिंग या दोन थोर व्यक्तींच्या जीवनातील  प्रसंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

कुमारी सृष्टी जगदाळे व प्रियांका शिंदे या दोन विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतामध्ये ज्ञान आणि संस्काराची शिदोरी देणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली व या शाळा माऊलीचे आम्ही सदैव ऋणी राहू असे वक्तव्य केले. शिक्षक मनोगतामध्ये प्राध्यापिका सौ.ऋता हजारे ,सौ. लतिका बर्गे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.   तसेच महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस कमिटी तर्फे विभाग स्तरीय 'सन्मान नारी शक्तीचा' पुरस्कार 2026 हा पुरस्कार प्राप्त झालेल्या विद्यालयातील शिक्षिका सौ गौरी राजेंद्र पवार यांचाही सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष नंदकिशोर जगताप, सचिव तुषार पाटील, संचालक चंद्रकांत पाटील, संचालिका हेमकांची यादव, मुख्याध्यापक अमरसिंह वसावे, पर्यवेक्षक यशवंत गायकवाड, माजी शिक्षक रामचंद्र जाधव, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर  कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नरहर कुरुंदकर स्मरणार्थ येत्या मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी डॉ. राजा दिक्षितांचे व्याख्यान

संबंधित बातम्या