मंगल कार्यालयातून दागिन्यांसह रोकडची चोरी

सातारा : मंगल कार्यालयातून अज्ञात चोरट्याने दागिन्यांसह रोकडची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देविका मंगल कार्यालयात अज्ञात चोरट्याने 39 हजार रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. ही घटना दि. 21 जानेवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी रुक्मिणी दिलीप जाधव (वय 49, रा. जाधववाडी पो. बिजवडी ता.माण) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरट्याने पर्समधून रोख 22 हजार रुपये, 7 हजाराचे पैंजण, 10 हजाराची कारची रिमोट चावी असा मुद्देमाल चोरी केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक पी. एम. वायदंडे करीत आहेत.


मागील बातमी
युवती बेपत्ता
पुढील बातमी
शहरांची स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा!

संबंधित बातम्या