लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवरील अत्याचारप्रकरणी माण तालुक्यातील खडकी येथील दोघा संशयितांना अटक

by Team Satara Today | published on : 24 July 2026


म्हसवड : लग्नाचे आमिष दाखवून तसेच जेजुरी येथे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी म्हसवड पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ जून ते १३ जुलै २०२६ या कालावधीत माण तालुक्यातील एका गावातील पीडितेच्या राहत्या घरी तसेच पुणे-जेजुरी मार्गावरील एका कारमध्ये ही घटना घडल्याचा आरोप आहे. मुख्य संशयित नागेश महादेव खांडेकर (रा. खडकी, ता. माण, जि. सातारा) याने लग्नाचे आमिष दाखवून तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केल्याची तक्रार आहे. या कृत्यात योगेश करचे याने मदत केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास पीडितेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा एमआयडीसीच्या १० प्रमुख मागण्यांना मंजुरी; खा. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले, सातारा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश
पुढील बातमी
विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? ; दिल्ली आंदोलनावरून राज ठाकरेंचा सरकारला थेट सवाल

संबंधित बातम्या