सातारा : जबरी चोरीच्या प्रयत्नासह विनयभंग प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 19 रोजी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास जुन्या प्रिस्क्रिप्शनवरून औषधाच्या गोळ्या मागण्याच्या कारणावरून पूजा गायकवाड आणि सुरज गायकवाड दोघेही रा. कोडोली, सातारा यांनी संभाजीनगर, देगाव रोड येथील भारत मेडिकल मधील पल्लवी अजित माने रा. कारंडवाडी, पोस्ट देगाव, ता. सातारा यांना मारहाण करून तसेच त्यांच्या दुकानातील सामानाचे नुकसान करून त्यांचे मंगळसूत्र हिसकवण्याचा प्रयत्न केला. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार महांगडे करीत आहेत.