सातारा : दिव्यनगरी येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिव्यनगरी, सातारा येथून अज्ञात चोरट्याने एमएच 11 सीएक्स 409 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 15 मार्च रोजी घडली असून याप्रकरणी हिदायतुल्ला हज शेख (वय 38, रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा