संगम हौसिंग सोसायटी परिसरात भावजयच्या दगडफेकीत वृद्ध जखमी

by Team Satara Today | published on : 27 August 2026


सातारा : पोलिसांत तक्रार का दिली, असा जाब विचारत शिवीगाळ व दमदाटी केल्यानंतर भावजयने दगड फेकून मारल्याने 66 वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना गोडोलीतील संगम हौसिंग सोसायटी परिसरात घडली.

अविनाश हरी नामदास (वय 66) यांनी याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 25 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अजंठा हॉटेलजवळ हा प्रकार घडला. पोलिसांत तक्रार का दिली, या कारणावरून सुनंदा चंद्रकांत नामदास यांनी अविनाश नामदास यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर दगड फेकून मारल्याने ते जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी सुनंदा नामदास यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस हवालदार देखणे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
देशमुख नगर येथे किरकोळ वादातून महिलेसह मुलाला मारहाण; तिघांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुढील बातमी
एमआयडीसीतील माने कॉलनी परिसरात घराबाहेर लावलेल्या दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या