सातारा : जिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प अजूनही काठापर्यंत भरले असून, १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. त्यामुळे पुढील काळात विसर्गही वाढणार असल्याने धरणांतील साठाही कमी होणार आहे. तसेच आठवड्यापासून कोयना धरणातून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे.
सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही मोठी धरणे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १४८ टीएमसी आहे. या धरणांतील पाण्यावर सातारा तसेच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील पाणी योजना अवलंबून आहेत. त्यामुळे पावसाळ्यात धरणे भरली की पुढील नऊ महिने चिंता करण्याचे कारण नसते. त्यातच यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १२० टक्क्यांहून अधिक पर्जन्यमान झाले. या पावसामुळे प्रमुख धरणांबरोबरच छोटे प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत चिंतेचे कारण राहिलेले नाही.
जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामातील पिके चांगली आलेली आहेत. त्यामुळे सध्या पिकांना पाणी देण्याची गरज आहे. यासाठी धरणांतून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील सध्या धोम, कण्हेर, कोयना आणि उरमोडी या धरणांतून पाणी सोडले जात आहे. तर सध्या कोयना धरणात अजूनही १०० टीएमसीवर पाणीसाठा शिल्लक आहे. तर धोममध्ये १२.५९ टीएमसी, कण्हेरमध्ये ९ टीएमसी पाणी शिल्लक आहे.
गेल्यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे उरमोडी धरणात जेमतेम सहा टीएमसीच पाणीसाठा झाला होता; पण यंदा धरण भरून वाहिले. त्यातच अजूनही धरण काठोकाठ आहे. या धरणावरच दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यांतील सिंचन योजना अवलंबून आहेत. यंदा कोयना धरणही भरल्याने शेतकऱ्यांची चिंता दूर झालेली आहे.
सांगलीसाठी १०५० क्युसेक विसर्ग
जिल्ह्यातील धोम धरणातून सध्या ७०५, कण्हेर धरणाच्या डावा आणि उजवा कालव्याद्वारे ४७५ क्युसेक पाणी विसर्ग सिंचनासाठी सुरू आहे. तर उरमोडी धरणातून १५० क्युसेक पाणी विसर्ग नदीद्वारे सोडण्यात आलेला आहे. हे पाणीही सिंचनासाठी जात आहे. तर कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. हे पाणी सांगली जिल्ह्यातील सिंचन तसेच इतर कारणांसाठी सोडण्यात आलेले आहे. सांगली जिल्ह्याची पाणी मागणी पुढील काळात आणखी वाढणार आहे.
जिल्ह्यातील पाणी प्रकल्प स्थिती..
धरण - सध्याचा साठा - टक्केवारी - एकूण क्षमता (टीएमसीमध्ये)
धोम - १२.५९ - ९३.२४ - १३.५०
कण्हेर - ९.२४ - ९१.४४ - १०.१०
कोयना - १००.२८ - ९५.२८ - १०५.२५
बलकवडी - ४.०४ - ९९.०४ - ४.०८
तारळी - ५.३४ - ९१.३३ - ५.८५
उरमोडी - ९.७९ - ९८.२७ - ९.९६
मकरंद पाटील यांचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
फोन उचलत नसल्याच्या कारणातून एकास मारहाण |
कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद |
...अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन |
ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले |
ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री |
सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला तर आंदोलनाने आवाज उठवू |
जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा |
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 : बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचा अभिनव उपक्रम |
स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकतीने लढूया... |
कामेरीचे जवान शुभम घाडगे यांना बलनोई येथे वीरमरण |
कॅबिनेट मंत्र्यांच्या समन्वयामुळे जिल्ह्याचा होणार विकास |
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद |
...अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन |
ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले |
ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री |
सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला तर आंदोलनाने आवाज उठवू |
जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा |
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 : बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचा अभिनव उपक्रम |
स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकतीने लढूया... |
कामेरीचे जवान शुभम घाडगे यांना बलनोई येथे वीरमरण |
कॅबिनेट मंत्र्यांच्या समन्वयामुळे जिल्ह्याचा होणार विकास |
दगडाने मारहाण प्रकरणी एकाविरोधात गुन्हा |
अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा |
मंगळवार पेठेतून दुचाकीची चोरी |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
शाहूनगरमधील घरफोडीची उकल |