बोबडेवाडीत जागतिक महिला दिनानिमित्त एकल महिलांचा सत्कार; मिळकत कर भरणाऱ्यांचा बक्षीस देऊन गौरव

by Team Satara Today | published on : 08 March 2026


सातारा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बोबडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील एकल महिलांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमासाठी स्वयंसिद्ध महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. समिंद्रा जाधव व सौ. नलिनी जाधव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. ग्रामपंचायत अधिकारी सौ. सारिका देशमुख, सरपंच सौ. अरुणा बोबडे, उपसरपंच अनिल पवार, ग्रामपंचायत सदस्य सौ. पवित्रा बोबडे, सौ. मंगल शिर्के, श्रीमती विमल पवार, किसन शिर्के, विजय बोबडे, सौ. पूजा पवार व कृषी सखी राजश्री पवार यांची उपस्थिती होती.

या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत बोबडेवाडीने नावीन्यपूर्ण पुढाकार घेत गावातील मिळकतदारांनी घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत भरल्याबद्दल त्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर रंगपंचमीचा उत्सवही साजरा करण्यात आला आणि महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी आशा सेविका सौ. आरती पवार, अंगणवाडी सेविका सौ. रेखा पवार व सौ. शुभांगी शिर्के, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल कर्पे तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीचे सेवक बजरंग बोबडे यांनी विशेष परिश्रम घेतले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहुपुरी येथील सनराईन मॉर्निंग ग्रुपतर्फे महिला दिनी कामगार महिलांचा सत्कार व भांडी वाटपाचा कार्यक्रम
पुढील बातमी
शासनाच्या योजनांपासून एकही व्यक्ती वंचित राहणार नाही - प्रांताधिकारी प्रमोद कुदळे; सातारारोड येथे महसूल समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

संबंधित बातम्या