महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर आंबेनळी घाटात दुदोशी फाट्याजवळ डोंगरावरून पडून रानगव्याचा जागीच मृत्य

by Team Satara Today | published on : 05 February 2026


सातारा : महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर आंबेनळी घाटात दुदोशी फाट्याजवळ डोंगरावरून पडून रानगव्याचा जागीच मृत्य झाला. महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर आंबेनळी घाटात दुदोशी फाट्याजवळ डोंगरावरून रानगव्याचा तोल गेल्याने शेकडो फुटांवरून रानगवा जमिनीवर कोसळल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रानगवे आहेत. या रानगव्यांचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात संचार असतो. अनेकदा रानगवे नागरी वस्तीतही फिरताना दिसत असतात. महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने व डोंगर उताराचा भाग असल्याने रानगवे खाद्याच्या शोधात डोंगरावरही फिरत असतात. कळपातून रस्ता चुकल्याने हा रानगवा महाबळेश्वरपासून पुढे महाडच्या बाजूला डोंगरावरून एकटाच जात होता. डोंगर उतारावरून खाली उतरत असताना तोल गेल्याने रानगवा खाली घसरला आणि रस्त्यावर आदळला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. रानगव्याचा मृत्यू झाल्याचे दिसताच अनेक वाहन आणि दुचाकीचालकांनी रस्त्यातच थांबून भरधाव वाहनांना सावध केले. वन विभागाचे अधिकारी येईपर्यंत अनेक वाहनचालक या ठिकाणी थांबून होते. माहिती मिळताच वन कर्मचारीदेखील घटनास्थळी दाखल झाले.

रानगव्याचे वजन जास्त असल्याने तो झाडात कोठेही अडकू शकला नाही. तो दरीच्या बाजूने थेट खाली कोसळला, असे प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'जाऊ तिथं खावू' ला खेडची जनता स्विकारणार नाही
पुढील बातमी
खैर वृक्षाच्या तोडप्रकरणी फडतरवाडीचे तिघे वनविभागाच्या ताब्यात; न्यायालयाकडून एक दिवसाची वन कोठडी

संबंधित बातम्या